Prithviraj Chavan On EC India | ‘निवडणूक आयोग स्वायत्त राहिला नसून सरकारी विभाग बनलाय’, पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘लोकशाहीची हत्या करण्यास न्यायाधीशांची मदत’
पुणे : Prithviraj Chavan On EC India | महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवारी (दि.१२) ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकशाहीची हत्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मदत केली असल्याचा गंभीर आरोप केला. (Election Commission Of India)
“निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिला नसून सरकारी विभाग बनला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर झाला. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे पैशाचे वर्तुळ तोडणे अवघड झाले आहे. आता ही विचारांची लढाई राहिली आहे का, हा प्रश्न आहे. पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवला गेला, सर्वोच्च न्यायालयाकडून निराशा झाली. लोकशाहीची हत्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मदत केली. हे पाहता लोकशाही उरलेली नाही, हे स्पष्ट होते”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ” विधानसभा निवडणुकांचा निकाल धक्कादायक होता. काँग्रेससह अनेकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास उरला नाही. निवडणूक आयोग निःपक्ष असला पाहिजे, तरच लोकशाहीला अर्थ राहील. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिला नसून सरकारी विभाग बनला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर झाला. हे पाहता लोकशाही उरलेली नाही, हे स्पष्ट होते. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे पैशाचे वर्तुळ तोडणे अवघड झाले आहे. आता ही विचारांची लढाई राहिली आहे का?, हा प्रश्न आहे. पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवला गेला. सर्वोच्च न्यायालयाकडून निराशा केली. लोकशाहीची हत्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मदत केली”, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
या कार्यक्रमावेळी पृथ्वीराज चव्हाण, मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे, आणि प्रा. नितीश नवसागरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, ऍड. स्वप्नील तोंडे, कमलाकर शेटे, कॉम्रेड ऍड. सयाजी पाटील, विकास लवांडे,
अजय भारदे, अरुण खोरे, मिलिंद गायकवाड, सुनीती सु. र. उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका