Prithviraj Chavan On Mahayuti Govt | ‘सरकार उद्या कोणालाही तुरुंगात टाकेल, ही तर निवडणुकीपूर्वीची तयारी’; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
मुंबई : Prithviraj Chavan On Mahayuti Govt | आज अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनुसरक्षा विधेयक- २०२४ या विधेयकावरून काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. चव्हाण यांनी विधानसभेतील कार्यक्रम पत्रिकेवर हरकतीचा मुद्दा मांडत महाराष्ट्र विशेष जनुसरक्षा विधेयक- २०२४ विधेयकावर आक्षेप घेतला. हे विधेयक मंजूर केले तर सरकार कुणालाही अर्बन नक्षलवादी म्हणून अटक करून तुरुंगात टाकू शकेल. निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे.तुम्ही याला मंजुरी दिलीच कशी, असा सवाल चव्हाण यांनी केला.
चव्हाण यांना नियम सांगून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चव्हाणांच्या मदतीला आले. वडेट्टीवारांची सूचना मान्य करत राहुल नार्वेकरांनी याबाबतचा निर्णय आपण घेऊ, असे सांगून पृथ्वीराज चव्हाणांच्या हरकतींवर विचार करण्याचा शब्द दिला.
विधेयकाची प्रत मिळालेली नसताना हे विधयेक पास करून घेतले जाणार असल्याचे चव्हाण म्हणाले. या विधेयकासाठी एक दिवसाचा अवधी तरी मिळाला पाहिजे. तुम्ही विधेयक पास करायला परवानगी कशी दिली असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना नियम १२३ अवगत करायची गरज नाही. पण, आपण मुख्यमंत्री असतानाही अनेक विधेयके एकाच दिवशी मांडून ती पास केली आहेत. त्यामुळे या कामकाजात कुठलीही अनियमितता नाही, असे त्यांनी सांगितले.
नार्वेकरांच्या स्पष्टीकरणानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी आपला मुद्दा पुढे रेटला. हा कायदा पास केला तर सरकार कोणालाही अर्बन नक्षलवादी म्हणून अटक करू शकेल, तुरुंगात टाकू शकेल. निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे. एकाच दिवशी बिल मांडून मंजूर करता येतं. पण, बिल वितरित तरी केलं पाहिजं. जोपर्यंत हे बिल वितरीत होत नाही, तोपर्यंत हा विषय स्थगित करावा, अशी मागणी चव्हाणांनी केली. बिलाची कॉपी आपल्यापर्यंत पोचविण्याची सोय त्वरित करण्यात येईल, असे उत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले. पण, त्यावरही पृथ्वीराज चव्हाणांचे समाधान झाले नाही. त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलायला उठले.
‘यापूर्वीचे दाखले देऊन आपण जे म्हटलं आहे, त्याबाबत आमचं काही दुमत नाही,’ असे वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्यावर नार्वेकरांनी आक्षेप घेत विरोधी पक्षनेत्यांनी चुकीचं रेकॉर्डवर आणणं थांबवलं पाहिजे. कारण मी एका दिवसांत बिल मांडून कसं पास करता येते, हे नियमाद्वारे दाखवून दिलं होतं. त्यासाठी मागील दाखले दिले नव्हते. (Prithviraj Chavan On Mahayuti Govt)
नार्वेकर यांनी घेतलेल्या आक्षेपावर वडेट्टीवार यांनी काहींशी नरमाईची भूमिका घेत विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात बोलायचा आम्हाला अधिकार नाही.
पण, आमच्या भावनांची आपण थोडीशी काळजी करावी. एवढीच आमची अपेक्षा आहे.
महत्वाचे बिल असून ते सकाळीच दिलं असतं, तर आम्हाला चर्चा करता आली असती.
बिल मांडायचं आणि लगेच मंजूर करायचं, हे चुकीचं होतंय. महत्वाचं बिलं आहे,
म्हणून यावर चर्चा व्हायला पाहिजे. साधं बिल असतं तर आम्हीच मंजूर करा असे सांगितले असते.
या बिलावर बोलण्यासाठी थोडा वेळ द्यावा.
हे बिल आज मांडावं आणि उद्या त्यावर चर्चा करून संमत करावे अशी त्यांनी मागणी केली.
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची सूचना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मान्य करत यासंदर्भातील निर्णय आपण घेऊ असे उत्तर दिले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड