Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’
मुंबई : Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा (Mahavikas Aghadi Melava) पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने मविआने विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र, आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena UBT) उद्धव ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलेली मागणी सध्या चर्चेत आहे.
विधानसभेसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, मी तुमच्या सोबत आहे, असे ठाकरे यांनी म्हटले होते. याबाबत, आज स्वत: चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा चेहरा संदर्भात उद्धव ठाकरे स्पष्ट बोललेले आहेत. उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा झालेली आहे. पण ज्यांचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री झाला तर पाडापाडी होते असे मला वाटत नाही. महाविकास आघाडी म्हणून जागावाटप आणि निवडणुकांना समोर जाण्याची प्राथमिकता आहे. चेहरा ही आमची प्राथमिकता नाही.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी त्यांचे मत व्यक्त केले, आम्ही आमचे मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही, आधी आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. तसेच जागा वाटपाच्या संदर्भात लवकरच आमची चर्चा सुरू होईल.
आगामी विधानसभा निवडणुकांबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर या निवडणुका पुढे ढकलल्या जातील याची स्पष्टता आली. महाराष्ट्रातील निवडणुका घेण्यास काही हरकत नव्हती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे म्हणणे देखील समजून घ्यायला हवे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चव्हाण म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये हिंसाचार सुरू आहे हे राज्यासाठी वाईट आहे. राज्यात सुरक्षा व्यवस्थीत ठेवणे ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सर्वांनी शांतता बाळगली पाहिजे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन