Private Vehicle Fair In Diwali | पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट; ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका
पुणे: Private Vehicle Fair In Diwali | दिवाळीचे निमित्त साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. खासगी ट्रॅव्हल्सचालकांच्या या मनमानीमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो. दिवाळीच्या सणात अतिरिक्त नफा खिशात घालण्यासाठी खाजगी व्यावसायिक गर्दी पाहून भाडे ठरवित आहेत.
पुण्यातून दररोज सुमारे ९०० खासगी बसची वाहतूक होते. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने बसच्या संख्येतही वाढ होते. दिवाळीमध्ये सुमारे ६०० खासगी बस अतिरिक्त धावतात. अनेक बसचालक गाड्या दुसऱ्यांकडून भाडेतत्वावर घेतात. त्यामुळे अशा गाड्यांचे तिकीट दर अन्य बसच्या तुलनेत अधिक असते.
राज्यात सर्वाधिक प्रवासी पुण्यातून मराठवाडा व विदर्भात प्रवास करतात. परराज्यात बंगळूर आणि हैदराबादसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असते. अनेक खासगी बसचालक ३०० किलोमीटरहून अधिक दूरच्या प्रवासासाठी धावणाऱ्या बसच्या दरात मोठी वाढ करतात.
तुलनेत साध्या बससाठी (सीटिंग) कमी दरवाढ केली जाते. यंदा २८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. प्रवाशांनी २६ ऑक्टोबरपासूनच प्रवासाचे नियोजन केल्याने पुण्याहून सुटणाऱ्या सुमारे ९०० खासगी बस आताच बुक झाल्या आहेत.
दिवाळी संपल्यानंतर परतीचा प्रवास आणखी महाग होतो. कोणत्याही परिस्थितीत नोकरी निमित्ताने पुण्याला यावे लागते. त्यावेळी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे पुणे गाठण्यासाठी प्रवाशांना खासगी बसवर अवलंबून राहावे लागते. अशावेळी खासगी बसचालक दिवाळीचा जो दर आकारतात त्यात आणखी ४०० ते ५०० रुपयांची वाढ करतात.
वातानुकुलित शयनयान बसचे तिकीट दर (रु)
ठिकाण सामान्य दिवाळीतील
पुणे-नागपूर – १२०० ,२५००-३०००
पुणे-लातूर- ६००, १२००-१५००
पुणे-इंदूर – १२००, २५००-३०००
पुणे-पणजी- ९००, १२००-१५००
पुणे-अहमदाबाद- १२००, २२००-२५००
पुणे-बंगळूर- १२००, २५००-३०००
पुणे-हैदराबाद- १२००, २५००-३०००
सामान्य दिवसाचे विमानाचे तिकीट
पुणे-बंगळूर – ३५००
पुणे-अहमदाबाद – ३२००
पुणे-हैदराबाद – ४३००
पुणे-नागपूर- ४१००
पुणे-पणजी- ३२००
खासगी बसचालकांनी नियमाप्रमाणे तिकीट दराची आकारणी करणे अपेक्षित आहे. या संदर्भात चालकांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या जातील.
- बाबा शिंदे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्रवासी व माल वाहतूक संघटना, पुणे)
दिवाळीत खासगी बसचालकांनी नियमापेक्षा जास्त दराची आकारणी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. बसच्या तपासणीसाठी वायू वेग पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.
- अर्चना गायकवाड (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?