Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

IAS Puja Khedkar

पुणे : Puja Khedkar Case | खोट्या प्रमाणपत्रांसह इतर कारनाम्यांमुळे (Fake Disability Certificate) अडचणीत आलेली आणि देशभरात चर्चेत असलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. विविध तपास यंत्रणा तिचा ठावठिकाणा शोधत आहेत. यूपीएससीने तिचे प्रशिक्षण थांबवून मसूरी येथील केंद्रात बोलावल्यानंतर पूजा खेडकर वाशीम (Washim) मधून निघाली होती. त्यानंतर ती गायब आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पूजा खेडकर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, ती अद्याप दिल्ली पोलिसांसमोर हजर झालेली नाही. पुणे पोलिसांनी (Pune Police) तिला तीनवेळा नोटीस पाठवूनही ती हजर झाली नाही. तसेच ती यूपीएससीच्या मसुरी प्रशिक्षण केंद्रात (UPSC Training Center Mussoorie) देखील पोहोचली की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) लाभ घेण्यासाठी नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate) सादर केले होते. त्यासाठी पूजा खेडकरने तिची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा घटस्फोट झाल्याचा दावा केला होता. आता या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. या अहवालावर केंद्र सरकार पूजा खेडकर जात प्रमाणपत्र वैध ठरवायचे की नाही याबाबत निर्णय घेऊ शकते.

दरम्यान, दिलीप खेडकर यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवताना शपथपत्रात
मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांचा उल्लेख पत्नी म्हणून केला होता.
त्यामुळे पूजाच्या अडचणी वाढल्या असून पूजा खेडकर पाठोपाठ दिलीप खेडकर (Dilip Khedkar) देखील गायब असल्याचे समजते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका!
पुणे महापालिकेने केले आवाहन

Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी
व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”

You may have missed