Puja Khedkar | ‘पूजा खेडकर फ्रॉड नसून फायटर’; दिल्लीच्या कोर्टात वकिलांनी वाचला खेडकरांच्या लेकीचा संघर्षाचा पाढा

IAS Puja Khedkar

दिल्ली : Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) अर्ज केला. त्याबाबत सुनावणी पार पडली. खेडकर यांच्या वकील वीणा माधवन (Adv Veena Madhavan) यांनी कोर्टात खेडकर यांची बाजू मांडली. यामध्ये UPSC ने अधिकारी म्हणून काही संरक्षण दिलेले असते.

यानुसार पोलिसांनी माझी चौकशी करू नये तर यूपीएससीने करावी अशी मागणी करत खेडकरने अटकेला विरोध केला आहे. तसेच आपण ४७ टक्के अपंग असल्याचेही एम्सचे प्रमाणपत्र कोर्टाला सादर करत नियमातच भरती झाल्याचा दावा केला आहे.

त्याचबरोबर जेव्हा आम्ही PUJA चे नाव बदलून POOJA असे केले त्या-त्या वेळी आम्ही गॅझेट नोटिफिकेशन केलं होतं. असा दावा खेडकरच्या वकिलांनी कोर्टात केला. पूजा खेडकर फ्रॉड नसून फायटर आहे. UPSC द्वारे प्रत्येक टप्प्यावर तिची उमेदवारी वैध करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला आहे.

ती दिव्यांग आहे. तिचे आईवडील घटस्फोटीत आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून? ती महिला आहे म्हणून? असे प्रश्न देखील पूजा खेडकरच्या वकिलांनी उपस्थित केले आहेत. (Puja Khedkar)

याप्रकरणात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. युपीएससीकडून दररोज पत्रकार परिषद घेतली जात आहे. पूजा खेडकर कधीच प्रसार माध्यमांसमोर गेल्या नाहीत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.

या सुहास दिवसे यांच्याविरुद्ध पूजाने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.
सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितल होते.
मात्र, पूजाने त्याला नकार दिला, असा दावा खेडकर यांचे वकील ॲडव्होकेट माधवन यांनी केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार