Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

IAS Puja Khedkar

पुणे : Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी (Controversial Probationary IAS Officer) पूजा खेडकर यांनी बनावट ओळखपत्र (Fake ID) सादर केल्याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच पूजा खेडकर यांचे आयएएस केडर रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar)आयएएस होते. ४० कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दिलेल्या शपथपत्रात दिसते. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गात नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) घेतले का? याची तपासणी सुरू आहे

खेडकर यांचे हे सर्व प्रताप मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीपर्यंत धडकले. खेडकर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या अनागोंदीबाबत अकादमीनेही राज्य सरकारला याबाबत अहवाल देण्यास सांगितले होते. दरम्यान यूपीएससीने, पोलिस अधिकाऱ्यांकडे एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक प्रकरणात कारवाई सुरू केली आहे. यासोबतच नागरी सेवा परीक्षा- 2022 च्या नियमांनुसार पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा- 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासाठी / भविष्यातील परीक्षांमधून काढून टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असताना आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा आणि ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्ड गाडीवर लावला होता. याशिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावे, तसेच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी मागणी केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आली. दरम्यान पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली.

त्यानंतर त्यांनी पुण्यात असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी छळ केल्याबाबत वाशिम पोलिसात तक्रार केली होती.
प्रकरण पुण्याचे असल्याने ते पुण्यात वर्ग करण्यात आले.
मात्र पुणे पोलिसांनी (Pune Police) पूजा खेडकरला दोनदा समन्स बजावूनही त्या उपस्थित राहिल्या नाहीत.
दिल्लीत यूपीएससी ने गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकर अटकेच्या भीतीने नॉट रिचेबल आहेत.
त्यामुळे आता पूजा खेडकर नेमक्या कुठे आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed