Puja Khedkar | पूजा खेडकरला अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे YCM चे डॉक्टर अडचणीत? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे आदेश

Puja Khedkar

पुणे : Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर या त्यांच्या विविध कारनाम्यांनी चर्चेत आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation – PCMC) वायसीएम रुग्णालयातून (YCM Hospital) देखील २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate) घेतल्याचे समोर आले आहे. याबाबतची नोंद रुग्णालयात असल्याचे आढळून आले. पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.

त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश केला आहे. त्यातील दिव्यांग प्रमाणपत्र नगरमधील सरकारी रुग्णालयातून (Govt Hospital) देण्यात आले आहे. २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग आणि २०२० मध्ये मनोविकार प्रमाणपत्र देण्यात आले. या दोन्हींचे एकत्रित प्रमाणपत्र सन २०२१ मध्ये देण्यात आल्याचे समोर आले होते.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून देखील खेडकर यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आले. खेडकर यांना २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. कोणत्या निकषांवर हे प्रमाणपत्र दिले होते, त्याची पडताळणी करण्यात येत असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे (Dr Rajendra Wable) यांनी सांगितले होते.

दरम्यान आता वायसीएम मधून पूजा खेडकरला प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजा खेडकरला मदत करणाऱ्या प्रत्येकाची सखोल चौकशी करावी. बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट असल्यास, ते उघडकीस आणण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने (Pune Collector Office) दिले आहेत.

खेडकर यांना २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यांच्या डाव्या गुडघ्याला सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे संबंधित प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र देतानाही नियमांचे पालन झाले नसल्याचे आरोप होत आहेत. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजा खेडकर यांनी केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वायसीएमच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे त्या प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यात का?
अशी शंका उपस्थित केली आहे. याची खात्री पटवण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे.
चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर,
तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.

बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट आहे का?
हे उघडकीस आणावे तसेच या संपूर्ण चौकशीचा अहवाल ही जिल्ह्याधिकारी कार्यालयाला सादर करावा असे
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आदेशात म्हंटले आहे.

“अस्थिरोग व फिजोथेरिपी विभागाला केलेल्या तपासणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
त्यांनी अहवाल दिला आहे. प्रमाणपत्र सात टक्क्याचे दिले आहे.
केंद्र शासनाच्या नियमावलीचे पालन करून पारदर्शकपणे हे प्रमाणपत्र दिले आहे”,
अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य

You may have missed