Puja Khedkar – Suhas Diwase | “त्यांनी मला रूममध्ये बोलावलं अन्…” पूजा खेडकरचा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर गंभीर आरोप

IAS Puja Khedkar-Collector Dr Suhas Diwase

पुणे : Puja Khedkar – Suhas Diwase | खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर चर्चेत आहे. पूजा खेडकरच्या असाधारण मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती.

त्याठिकाणच्या पोलिसात (Pune Police) त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात (Pune Collector) छळ केल्याची तक्रार दिली होती. त्या दरम्यान यूपीएससी (UPSC) कडूनही खेडकरच्या विरोधात बनावट दस्ताऐवज (Fake Documents) बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खेडकर नॉट रिचेबल होत्या.

दरम्यान दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. यामध्ये खेडकरने अटकेला विरोध केला आहे. तसेच आपण ४७ टक्के अपंग असल्याचेही एम्सचे प्रमाणपत्र (Desirability Certificate) कोर्टाला सादर करत नियमातच भरती झाल्याचा दावा केला आहे.

खेडकरच्या वकील वीणा माधवन यांनी कोर्टात बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांचा लैगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हंटले.

पूजा खेडकरची न्यायालयात बाजू मांडताना वकील वीणा माधवन म्हणाल्या, याप्रकरणात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. युपीएससीकडून दररोज पत्रकार परिषद घेतली जात आहे. पूजा खेडकर कधीच प्रसार माध्यमांसमोर गेल्या नाहीत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.

या सुहास दिवसे यांच्याविरुद्ध पूजाने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितल होते. मात्र, पूजाने त्याला नकार दिला, असा दावा खेडकर यांचे वकील ॲडव्होकेट माधवन यांनी केला.

खेडकरची बाजू मांडताना त्या पुढे म्हणाल्या, पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आता ते म्हणत आहेत की, माझी पोलीस कोठडीत चौकशी झाली पाहिजे.
पण मी काय केलं आहे? सरकारी यंत्रणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करताना इतकी तत्परता का दाखवली.
मला माझ्या बचावाची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी मिळाली पाहिजे.

माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल केल्याने आणि मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
असल्याने मी माझा बचाव करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे.
मला अटक करण्यास स्थगिती दिल्यास मला बचावाची संधी मिळेल, असे पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार