Pune ACB File FIR On Pravin Ahire | पुणे : तत्कालीन शिक्षण उपसंचालकाकडे मिळाली अधिकची मालमत्ता, पुणे एसीबीकडून शिक्षण उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune ACB File FIR On Pravin Ahire | शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तत्कालीन उपसंचालक व सध्या नंदुरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण वसंत अहिरे (वय-46) व त्यांची पत्नी स्मिता प्रविण अहिरे (वय-41 दोघे रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी ज्ञात उत्पनापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.4) गुन्हा दाखल केला आहे. दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. एसीबीच्या चौकशीत पुणे विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक व सध्या नंदुरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी असलेले प्रवीण अहिरे व त्यांच्या पत्नी स्मिता अहिरे यांनी विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा त्यांनी 25.26 टक्के (31 लाख 78 हजार 200) अधिक मालमत्ता मिळून आली.
उपसंचालक कार्यालयातील रखडलेले काम करून देण्यासाठी प्रविण अहिरे 50 हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार पुणे एसीबीकडे आली होती. विभागातील शिपायाला तडजोडी अंती 26 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. शिपायाल लाच घेण्यासाठी प्रवीण अहिरे याने प्रोत्साहन दिले होते. (Pune ACB File FIR On Pravin Ahire)
आरोपी प्रवीण अहिरे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. त्यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केल्या आहेत किंवा कसे? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली होती.
प्रवीण अहिरे यांनी 18 मार्च 2002 ते 10 फेब्रुवारी 2020 या कार्यकाळात त्यांना प्राप्त झालेल्या
कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता स्वत:च्या व पत्नी स्मिता अहिरे
यांच्या नावाने संपादित केल्याचे निष्पन्न झाले.
प्रवीण अहिरे यांनी 31 लाख 78 हजार रुपये किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केली.
त्यामुळे याप्रकरणी विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी प्रवीण अहिरे
यांना त्यांची पत्नी स्मिता अहिरे यांनी सहाय्य करुन गुन्ह्यात प्रोत्साहित केले.
त्यामुळे तत्कालीन शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे व त्याची पत्नी स्मिता अहिरे
यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर