Pune ACB News | पिंपरी चिंचवड महापालिकेतील पाणी पुरवठा व जलनिसारण विभागाचे तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगे याच्यावर बेकायदा मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : Pune ACB News | पिंपरी चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Municipal Corporation-PCMC) पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभागाचे (PCMC Water Supply) तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगे (Kishor Shinge) यांच्यावर उत्पन्नापेक्षा १०२ टक्के अधिक बेकायदा मालमत्ता धारण केल्याबद्दल वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर शिंगे यांनी ५० लाख ४० हजार २६४ रुपयांचा अपसंपदेबद्दल हिशोब देऊ शकले नाहीत. (Illegal Property)
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भासले (Madhuri Bhosale DySP) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर शिंगे यांनी १८ डिसेंबर १९८७ ते ३१ जुलै २०१७ या परिक्षण कालावधीत संपादित केलेल्या अपसंपदेबाबत त्यांना पुरेशी व वाजवी संधी देऊनही ते समाधानकारकरित्या स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. (Pune ACB News)
तसेच त्यांनी संपादित केलेली मालमत्ता त्यांचे ज्ञात स्त्रोताच्या उत्पन्नाच्या प्रमाणाशी विसंगत असल्याने त्यांनी ५० लाख ४० हजार २६४ रुपये इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केली आहे. स्वत :ला व त्यांच्या पत्नीला अनुचितपणे अवैधरित्या समृद्ध केले आहे. त्यास पत्नी भाग्यश्री किशोर शिंगे यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Disproportionate Assets)
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sirdeshpande),
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे अधिक तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण