Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना पोलिस हवालदार जाळ्यात
पुणे : Pune ACB Trap Case | बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी पोलीस ठाण्यातील (Dighi Police Station) पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले. (Pune ACB Trap Case)
अमोल दशरथ जाधव Amol Dashrath Jadhav (वय ४३) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षाच्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. (Pune Bribe Case)
चर्होलीतील चोविसावाडी (Chovisawadi Charholi) येथे तक्रारदार यांनी बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला होता. परंतु, बिल्डरने हा फ्लॅट परस्पर दुसर्याला विकून तक्रारदार यांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली होती. बिल्डरविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरुन बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास मदत करुन पुढील योग्य ती मदत करण्यासाठी पोलीस हवालदार अमोल जाधव याने तक्रारदार यांच्याकडे २ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी १६ व १८ जुलै करण्यात आली. त्यात हवालदार जाधव यांनी तडजोडीअंती १ लाख ७० हजार रुपये स्वीकरण्याची तयारी दर्शविली. आळंदी – विश्रांतवाडी रोडवरील (Alandi Vishrantwadi Road) वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथे गुरुवारी दुपारी तक्रारदाराकडून १ लाख ७० हजार रुपये घेताना हवालदार जाधव याला पकडण्यात आले. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shreeram Shinde) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार