Pune ACB Trap Case | पुणे: पोलीस अधिकार्याला लाच देण्याचा प्रयत्न करणार्या इस्टेट एजंटला अटक

पुणे : Pune ACB Trap Case | गुन्ह्यात कारवाई होऊ नये, यासाठी अनेकदा लाच देताना पोलीस अधिकार्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून पकडले जाते. पण, एका पोलीस अधिकार्याला लाच देण्याचा प्रयत्न करणार्या रिअल इस्टेट एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. (Pune Bribe Case)
हसनअली गुलाब बारटक्के Hasanali Gulab Bartakke (वय ४५, रा़ सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड) असे लाच देणार्याचे नाव आहे.
याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे (Bundgarden Police Station) सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम (API Nandkumar Kadam) यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. आरोपी हसनअली बारटक्के याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१४, ३१६ (२), ३१८(४) अन्वये विश्वासघात व हुंड्यासाठी त्रास दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्याकडे आहे. कदम यांनी या गुन्ह्यात मदत करावी, म्हणून हसनअली बारटक्के याने लाच देण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. परंतु, कदम यांना लाच स्वीकारायची नसल्याने त्यांनी बारटक्के विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. ताडीवाला रोड पोलीस चौकी येथे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना २ हजार रुपयांची लाच दिली असता बारटक्के याला रंगेहाथ पकडण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sardeshpande), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एखाद्या नागरिकाला पकडण्यात आल्याची गेल्या कित्येक वर्षातील ही हिली घटना आहे. (Pune ACB Trap Case)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Goyal Properties Pune | राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचा गोयल प्रॉपर्टीज या बांधकाम कंपनीला दणका,
घर खरेदीदारांना दोन महिन्यात रक्कम सव्याज परत करण्याचे आदेश
Shivaji Road Pune Accident News | मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक;
लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात (Video)