Pune ACB Trap Case | पुणे : सात बारावर नोंद घेण्यासाठी लाच घेताना तलाठी जाळ्यात; तलाठ्याचा रेट प्रत्येक गुंठ्याला एक हजार रुपये

Pune ACB Trap Case | Bribe demanded at night, returned in the morning! Constable and private person arrested for demanding bribe to cancel warrant

पुणे : Pune ACB Trap Case | ऑनलाईन फेरफार नोंद ग्राह्य धरण्यासाठी व ७/१२ उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याला रंगेहाथ पकडले. (Pune Bribe Case)

सुधीर दत्तात्रय तेलंग Sudhir Dattatraya Telang (वय ६५, रांझे ता. भोर) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी रांक्षे गावात वीस गुंठे जागा खरेदी केली होती. तक्रारदार यांचे नावावर या जागेची ऑनलाईन फेरफार नोंद ग्राह्य धरण्यासाठी व ७/१२ उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी तक्रार हे तलाठी सुधीर तेलंग यांना भेटले. सुधीर तेलंग याने प्रत्येक गुंठ्यास १ हजार रुपये प्रमाणे २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यात सुधीर तेलंग याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिवापूर ग्रामपंचायत आवारातील रांझे तलाठी कार्यालयात २१ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून सुधीर तेलंग याने २० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. (Pune ACB Trap Case)

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे
यांच्या मार्गदर्शनाखाली ही सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?

You may have missed