Pune ACB Trap Case | उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी लाच मागणाऱ्या महा ई सेवा केंद्राचालकासह कॉम्प्युटर ऑपरेटर महिला जाळ्यात

पुणे : Pune ACB Trap Case | तहसिल कार्यालयात ओळख असल्याचे सांगून उत्पन्नाचा दाखला (Proof Of Income) व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी (Domicile Certificate) ५ हजार रुपयांची लाच (Demand Of Bribe) मागणार्या व अडीच हजार रुपये घेताना महा ई सेवा केंद्रचालक (Maha E Seva Kendra) व कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
https://www.instagram.com/p/DAFfFJgCyIJ
संतोष बबन वाळके Santosh Baban Walke (वय ४८, गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्र चालक, दिघी) आणि नंदा राजू शिवरकर Nanda Raju Shivarkar (वय ३६, कॉम्प्युटर ऑपरेटर, गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्र, दिघी) अशी कारवाई केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका ५४ वर्षाच्या नागरिकाने तक्रार केली होती.
https://www.instagram.com/p/DAEFm2xiYSq
तक्रारदार हे उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी दिघी येथील गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्रात गेले होते. संतोष वाळके व नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांना आमची तहसिल कार्यालयात ओळख आहे. ही कामे करुन देण्यासाठी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यात त्यांनी ही कामे करुन देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर दिघी येथील गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्र येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून अडीच हजार रुपये घेताना नंदा शिवरकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap Case)
https://www.instagram.com/p/DAEDJQsiZjU
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sirdeshpande), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक विरनाथ माने (PI Veernath Mane) तपास करीत आहेत.
https://www.instagram.com/p/DAEA2w9CkCu
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा