Pune ACB Trap Case | पाणी पट्टीचे बिल नियमित करुन देण्यासाठी लाच घेणारे पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर जाळ्यात

ACB-PCMC

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे : Pune ACB Trap Case | पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात असताना ते नियमितपणे जितका वापर होईल तितके बिल काढण्यासाठी १ हजार ६०० रुपयांची लाच घेताना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation – PCMC) ह प्रभागातील पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर यांना सापळा रचून पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. (Pimpri Bribe Case)

पाणी मीटर निरीक्षक विकास सोमा गव्हाणे (Vikas Soma Gavane) आणि कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर आशा कानिफनाथ चौपाली (Kanifnath Choupali) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. (Pune ACB Trap Case)

तक्रारदार यांचे पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात आहे. ते नियमितपणे म्हणजे जितका वापर होईल तितके बील काढण्यासाठी पाणी मीटर निरीक्षक विकास गव्हाणे याने स्वत:साठी १ हजार रुपये व कॉम्प्युटर ऑपरेटर आशा चौपाली हिच्यासाठी ६०० रुपये असे १ हजार ६०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता अशा चौपाली हिने तक्रारदार यांच्या पाणीपुरवठ्याचे बील नियमित करुन देण्यासाठी स्वत:साठी ६०० रुपये व विकास गव्हाणे याच्याकरीता १ हजार रुपये असे १ हजार ६०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ह प्रभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून १ हजार ६०० रुपये
स्वीकारताना अशा चौपाली हिला पकडण्यात आले.
त्यानंतर अशा चौपाली हिने विकास गव्हाणे याला त्यांच्यासाठी तक्रारदाराकडून स्वीकारलेल्या लाच
रक्कमबाबत फोन वरुन विचारले असताना विकास गव्हाणे याने त्याच्यासाठी स्वीकारलेली रक्कम
अशा चौपाली हिच्याकडे ठेवण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. दोघांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sirdeshpande), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले (PI Amol Bhosale) पुढील तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल


You may have missed