Pune Accident Cases | शुक्रवार आणि शनिवार रात्री 8 ते पहाटे 3 ही वेळ पुणेकरांसाठी धोकादायक; या वेळेत पुण्यातील रस्त्यावर होतात सर्वाधिक 36 टक्के प्राणघातक अपघात होतात, 54 टक्के अपघात हिट अ‍ॅन्ड रन श्रेणीत

Pune Accident Cases | Friday and Saturday 8 pm to 3 am is the most dangerous time for Punekars; 36 percent of fatal accidents occur on Pune roads during this time, 54 percent of accidents are in the hit and run category

पुणे : Pune Accident Cases | पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात सातव्या स्थानी असल्याचे सांगितले जात असतानाच शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी रात्री ८ ते पहाटे ३ या वेळेत पुण्यातील रस्त्यांवर सर्वाधिक प्राणघातक अपघात होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुणे शहरात २०२५ मध्ये झालेल्या २९० प्राणघातक अपघातांपैकी ३६ टक्के (१०३) प्राणघातक अपघात या दोन दिवशी होतात. त्याचवेळी शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवशी रात्री ८ ते पहाटे ३ वाजेच्या दरम्यान ८५ अपघात झाले होते. त्याचवेळी शहरातील एकूण प्राणघातक अपघातातील ५४ टक्के अपघात हे हिट अ‍ॅन्ड रन श्रेणीत मोडले जातात. अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत न करता पळून जातात.

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पुणे शहर वाहतूक शाखेने वर्षभरात झालेल्या अपघातांचा अभ्यास करुन त्याचे विश्लेषण केले आहे. त्यामधून ही माहिती समोर आली आहे. या माहितीतून पुणे शहरातील वाहतूक आणि अपघाताबाबत झालेल्या चिंताजनक वाढ दर्शविली गेली आहे.

वाहतूक शाखेने २०१९ ते २०२५ मधील अपघातांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. त्यात २०१९ मध्ये १७२ प्राणघातक अपघातात १७३ जणांचा मृत्यु झाला होता. २०२५ मध्ये २७५ प्राणघातक अपघातात २९० जणांचा बळी गेला आहे. अपघातात २० टक्के आणि मृत्युमध्ये १९ टक्के वाढ झाली आहे.
गंभीर अपघातात तर ७४ टक्के वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ३८६ गंभीर अपघातात ४७३ जण गंभीर जखमी झाले होते. त्याचवेळी २०२५ मध्ये ६८८ अपघातात ८३४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रोड अपघातात मृत्यु पडलेल्यांमध्ये ९० टक्के हे पादचारी आणि दुचाकीस्वार आहेत.

२०२५ मध्ये झालेल्या गंभीर अपघातामध्ये ८८ टक्के दुचाकीस्वार आणि पादचारी यांचा समावेश आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे शहरात मृत्यु पावलेल्या ५२ टक्के (१३८) मध्ये २० ते ४९ वयोगटातील पुरुष आहेत. या अपघातात घरातील कमावता पुरुष मृत्यु पावल्याने संपूर्ण घरावर संकट कोसळले.

गंभीर अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये २० ते ४९ वयोगटातील ६२ टक्के (४६२ पुरुष) जायबंदी झाले आहेत. त्यातील अनेकांना कायमस्वरुपी किंवा गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उर्वरित आयुष्यावर या अपघातांचा परिणाम झालेला आहे.

सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून देशात पुणे शहराची ओळख निर्माण झाली आहे. त्याचवेळी ९१ टक्के प्राणघातक अपघातात ५३ टक्के वाहने दुचाकी होती. तर ३८ टक्के हे पादचारी होते.

दुचाकी वाहनचालकांच्या मृत्युमध्ये १५ टक्के वाढ झाली असतानाच पादचारींच्या मृत्युमध्ये तब्बल ४१ टक्के वाढ झाली आहे.

२०२१ मध्ये अपघातांमध्ये ७३ पादचारी आणि १३६ दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला होता. त्याचवेळी २०२५ मध्ये १०३ पादचारी आणि १५६ दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला आहे.

गंभीर अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या संख्येत ४९ टक्के तर पादचार्‍यांच्या संख्येत तब्बल १४१ टक्के वाढ झाली आहे.

२०२१ मध्ये ११२ पादचारी आणि ३११ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. २०२५ मधील गंभीर अपघातात २७१ पादचारी आणि ४६४ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे.

२०२५ मध्ये अपघातात मृत्यु पावलेल्यांमध्ये २० ते ४९ वयोगटातील तब्बल ७३ टक्के (८७) त्याचवेळी ३० ते ६९ वयोगटातील ७२ टक्के (५३) पादचार्‍यांचा मृत्यु झाला आहे.

गेल्या वर्षी कल्याणीनगर येथील उद्योजकाच्या अल्पवयीन मुलाने पार्शे कार अपघाताचे प्रकरण गाजले होते. पुणे शहरातील एकूण अपघातापैकी ५४ टक्के (१४५) प्राणघातक अपघात हे हिट अ‍ॅन्ड रन श्रेणीत गणले जातात.

जड वाहने ठरतातहेत काळ

शहरातून धावणार्‍या टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी, सिमेंट कंटेनर, मिक्सर यांना अनेक रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांना गर्दीच्या वेळी या रस्त्यांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे. असे असतानाही ही जड वाहने बेफामपणे धावत असतात.

पुणे शहरात झालेल्या २९० प्राणघातक अपघातामध्ये सर्वाधिक ११६ अपघात हे जड वाहनांनी केले आहेत. त्यात २९ (२८ टक्के) पादचारी, १ सायकलस्वार, ७५ (४६ टक्के) दुचाकीस्वार ११ इतर वाहनचालकाचा समावेश आहे.

You may have missed