Pune Accident News | लंगडत लंगडत बससमोर आला, एसटी चालकाने बस पुढे घेतली अन्..; पुण्यातील दुर्दैवी घटना

Bhor Pune Accident News

भोर / पुणे : Bhor Pune Accident News | एसटी बसच्या चाकाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर एसटी स्टँडमध्ये घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.15) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रुपेश गायकवाड असे या तरुणाचे नाव असून तो पोलादपूर जि. रायगड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

रुपेश गायकवाड हा तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूनं पलीकडे उजव्या बाजूला जात होता. त्यावेळी बस चालकाने अचानक बस पुढे घेतली. बसचे चाक रुपेशच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रुपेशच्या पायाला दुखापत झाली होती. तो लंगडत लंगडत चालत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

पायाला लागल्यामुळे चालताना त्याला वेदना होत होत्या. तो हळू हळू चालत एसटीजवळ आला आणि उभा राहिला. त्यानंतर काही क्षणातच एसटी चालकाने बस पुढे घेतली. एसटी वेगाने पुढे येताच रुपशेला पायाच्या दुखापतीमुळे लेगच बाजूला होता आले नाही आणि त्यात त्याला बसने ठोकर दिली. तो खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरुन चाक गेले. (Pune Accident News)

या घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार