Pune Accident News | पिंपरी: कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, पळून गेलेल्या आरोपीला अटक

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Accident News | रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगातील कारची धडक एका दहा वर्षाच्या मुलाला बसली. धडक बसल्यानंतर कारचे चाक डोक्यावरुन गेल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेऊन चिखली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुदळवाडी येथील पाटील चौकात झाला होता.
मोहम्मद अफजल खान (वय-10 रा. पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वडील कमाल अहमद मंजूर अल्ली खान (वय-40 रा. पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी एमएच 14 एच यु.0823 वरील चालक विक्रम दादाभाऊ कसबे (वय-41 रा. श्रीराम कॉलनी) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1), 125(ब), मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Accident News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा मोहम्मद हा पाटील चौकात रस्ता ओलांडत होता.
त्यावेळी भरधाव वेगातील कारची धडक फिर्यादी यांच्या मुलाला बसली.
धडक बसल्याने कारचे चाक मोहम्मद याच्या डोक्यावरुन गेले.
यामध्ये त्याच्या डोक्यावरुन कारचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला.
फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तपास पथकाने आरोपी निष्पन्न केला.
आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर