Pune Accident News | पुणे: भीषण अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू; महिलेने अपघातात पती आणि मुलीला गमावलं

पुणे : Pune Accident News | शिरूर तालुक्यातील न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कैलास कृष्णाजी गायकवाड (वय-५०), गौरी कृष्णाजी गायकवाड (वय-१८), गणेश महादेव निर्लेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुर्गा कैलास गायकवाड या जखमी झाल्या आहेत. हा अपघात न्हावरे (ता. शिरूर) येथे न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर सरके वस्तीनजीक रविवारी (दि.२३) ९ वाजताच्या सुमारास घडला.
अधिक माहितीनुसार, गायकवाड कुटुंबीय वाघोली पुणे येथून न्हावरे कडे येत होते. न्हावरे बाजूकडून तळेगाव कडे जाणाऱ्या कंटेनर नं एन. एल. ०५ जी २३९६ च्या अज्ञात चालकाने निष्काळजीपणाने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोरून येणाऱ्या स्वीफ्टला जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलग गणेश निर्लेकर यांचा मृत्यू झाला, तर कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड जखमी झाल्या आहेत.
महिलेने या अपघातात आपला पती आणि मुलीला गमावले आहे. दरम्यान अपघाताची काही माहिती न देता चालक तेथून पळून गेला. कंटेनर अज्ञात चालकाविरुध्द शिरूर पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.