Pune Accident News | पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या चिरंजीवांचा ‘कार’नामा, हॅरियर कारने दोघांना उडवलं; गुन्हा दाखल

Saurabh Bandu Gaikwad

पुणे : Mundhwa Pune Accident News | शहरातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं (Kalyani Nagar Car Accident Pune). यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे (Drink And Drive Cases). तरी देखील बड्या बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांच्या जीव धोक्यात घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. पोर्शे अपघातानंतर पुण्यात अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने दारु पिऊन टेम्पोला जोरात धडक दिली. त्यामध्ये चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu Gaikwad) उर्फ बंडू तात्या यांचा मुलगा सौरभ गायकवाड (Saurabh Bandu Gaikwad) याने दारू पिऊन अपघात केला. ड्रंक एन्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झालेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय.

पुण्यातील मांजरी – मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे मंगळवारी (दि. 16) पहाटे हा अपघात घडलाय.‌ सौरभ गायकवाड हा हॅरीयर कार (MH 12 TH 0505) घेऊन पहाटे साडे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्यामुळे समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली.

अपघातानंतर त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी जखमी चालक राजा शेख याला वरद लाइफ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी, चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला होता. तर क्लीनर राजा शेख याच्या चेहऱ्यावर खरचटले असून पायला जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सौरभ याने उलट्या दिशेने भरधाव वेगात येऊन टेम्पोला धडक दिली. अपघातानंतर तो घटनास्थळी न थांबता निघून गेला. (Pune Accident News)

याप्रकरणी सौरभ गायकवाडच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात
भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(अ), 125(ब), मोटार वाहन कायदा कलम 184, 134(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिपक बाबुराव हिवराळे (वय-36 रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे.
सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed