Pune Accident News | स्कुल बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने खांबाला धडकून बसचालकासह शालेय मुले किरकोळ जखमी

Pune Accident News | School bus driver loses control, hits pole, school children and bus driver injured

पुणे : Pune Accident News | उजव्या बाजूने आलेल्या वाहनाला जागा देण्याच्या नादात स्कुल बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबाला धडकली. त्यात बसचालकासह शालेय विद्यार्थी जखमी झाले.

बसचालक अमोल विनायक बोराटे Amol Vinayak Borate (रा. महादेव मंदिर, काळेबोराटेनगर, हडपसर) याच्यावर काळे पडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात काळेपडळ येथील म्हसोबा मंदिराजवळ २ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात स्कुल बसमधील विद्यार्थी आरोही कुंभार, अर्णव शेलार, संस्कार शितोळे, प्रेम थडगे, प्राची पांडुरंग मुंडे हे जखमी झाले.

याबाबत बीट मार्शल नंदकुमार राजेंद्र जावळे (वय ३५) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बीट मार्शल म्हणून पेट्रोलिंग करत असताना त्यांना हडपसर येथील रेल्वे मार्गावरील म्हसोबा मंदिराजवळ स्कुल बस लोखंडी खांबाला धडकली असून बसचालक व बसमधील मुले जखमी झाले असल्याचा मेसेज मिळाला. ते तातडीने घटनास्थळी पोहचले.

माळवाडी येथील साधना शैक्षणिक संकुलातील न्यू इंग्लिश स्कुलची स्कुलबस घेऊन अमोल बोराटे हा फराटे चौकाकडून म्हसोबा मंदिरकडे जात होता. बसमध्ये सुमारे ३५ मुले होती. उजव्या बाजूने एक वाहन वेगाने आले. त्याला जागा देण्यासाठी बोराटे याने बस डाव्या बाजूला घेतली. त्यात त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली त्यात बसचालक अमोल बोराटे हा स्वत: जखमी झाला. बसमधील मुलांना किरकोळ जखमा झाल्या. चार मुलांना ओम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातात बसचा पुढील भाग तुटला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. पोलीस उप निरीक्षक पुजा पाटील तपास करीत आहेत.

You may have missed