Pune Accident News | भरधाव थार गाडीने टेम्पो, वॅगनर गाडीला ठोकले; एअरपोर्ट रोडवरील 509 चौकात सोमवारी दुपारी झाला अपघात, थार चालकाने मद्य प्राशन केल्याचा संशय
पुणे : Pune Accident News | एअरपोर्ट रोडवर भर दुपारी १२ वाजता भरधाव जाणार्या थार गाडीने एका वॅगनर व टेम्पोला जोरात धडक दिली. या अपघातात तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरपोर्ट रोडवरील ५०९ चौकात एक थार गाडी भरधाव वेगाने येत होती. तिने आपल्या उजव्या बाजूने एका वॅगनरला जोरात धडक दिली. त्यानंतर टेम्पोला उडविले. तेव्हा लोकांनी त्याला जबरदस्तीने थांबवले. या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व त्यांच्या सहकार्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. थारचालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितले की, या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाले आहेत. थारचालकाने मद्य प्राशन करुन गाडी चालविल्याचा संशय असून त्याला मेडिकलसाठी पाठविण्यात आले आहे.
