Ambegaon Pune Accident News | भरधाव पिकअप गाडीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना
ऑनलाइन टीम : Ambegaon Pune Accident News | भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने रस्त्यावरील दुचाकीला मागून जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागापूर-वळती (ता-आंबेगाव) रस्त्यावर घोडनदी पुलाजवळ कोळीफाटा येथे सोमवार (दि.२९) रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास घडली.
यामध्ये दुचाकीस्वार सोपान एकनाथ दिघे (वय ३३, रा. वळती), व सोबत असणारा अज्ञात व्यक्ती अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या पिकअप गाडी चालक अभिषेक खंडू जाधव (रा. वळती) यावर पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागापूर (ता. आंबेगाव) येथील कोळी फाट्यावर असणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास पारगाव येथून आपल्या कामावरून सोपान दिघे हे घरी वळती या ठिकाणी जात होते. त्यांच्या सोबत दुचाकीवर एक अज्ञात व्यक्तीही बसलेला होता. (Pune Accident News)
पुलाच्या जवळ काही अंतरावर असताना पाठीमागून मंचर बाजूकडून येणारी पिकअप गाडी (नंबर एम एच १४ के क्यू ८०७९) या गाडीने सोपान एकनाथ दिघे हे जात असलेल्या (एम एच १४ आर ३४९७) या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
त्यामध्ये पिकअप गाडीने त्या दोघांमधील एकाला शंभर फूट अंतरावर फरफटत नेले.
या अपघातामध्ये सोपान दिघे यांच्या डोक्याला व खांद्यास तसेच अनोळखी व्यक्तीच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती पारगाव पोलिस ठाण्यात निलेश एकनाथ दिघे यांनी दिली असून पुढील तपास पारगाव पोलिस करत आहे.
अपघातातील अज्ञात व्यक्तीचा फोटो पोलिसांनी परिसरातील अनेक गावात पाठवला परंतु
या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्यामुळे दिघे यांनी अज्ञात प्रवाशाला लिफ्ट दिली
असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश