Pune Airport Boom Blast Threat | पुणे विमानतळावरील 11 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; शहरात मोठी खळबळ

Air-India-Flight

पुणे: Pune Airport Boom Blast Threat पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या ११ विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. एक्स वरून एका नामांकित एअर कंपनीच्या मॅनेजरला ट्विट करत उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या कंपनीच्या मॅनेजरला एक ई-मेल आणि एक्स पोस्ट आली असून, यामध्ये या आरोपीने पुण्याहून परदेशासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहेत, अशी धमकी दिली आहे.

या धमकीमुळे विमानतळासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही विमाने दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या शहरात निघाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील नऊ दिवसात विविध ठिकाणच्या १७० हुन अधिक विमानांना बॉम्बने उडवून देण्याबाबत धमक्या मिळाल्या आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू