Pune Airport | पुणे विमानतळाचा प्रवासी सुविधांचा दर्जा घसरला; एएसक्यू सेवा गुणवत्ता निर्देशांकात 16 सेवांमध्ये घसरण; जाणून घ्या
पुणे : Pune Airport | विमानतळावरील प्रवासी संख्या वाढत असताना प्रवासी सुविधांचा दर्जा घसरत असल्याचे चित्र आहे. सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्यातीलच असल्याने भविष्यात विमानतळाचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
एअर पोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या वतीने सर्वेक्षण करून विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांक जाहीर केला जातो. जगभरातील ९५ देशांतील ४०० विमानतळांचे सर्वेक्षण यासाठी केले जाते. यात देशातील १४ विमानतळांचा समावेश आहे. यंदा एप्रिल ते जून या तिमाहीतील सर्वेक्षणाच्या आधारे पुणे विमानतळ या निर्देशांकात ७६ व्या स्थानी घसरले आहे.
पुणे विमानतळाला ५ पैकी ४.८१ गुण मिळाले आहेत. त्याआधीच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत पुणे विमानतळ ७१ व्या स्थानी होते आणि विमानतळाला ४.८३ गुण मिळाले होते. त्यामुळे विमानतळावरील प्रवासी सुविधांचा दर्जा घसरल्याचे समोर आले आहे. (Pune Airport)
सेवा गुणवत्ता निर्देशांकात विमानतळावरील ३१ महत्वाच्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यामध्ये स्वच्छता, सुरक्षा, वायफाय, चार्जिंगची उपलब्धता, विमानांच्या उड्डाणांची माहिती, बसण्याची व्यवस्था या सह इतर गोष्टींचा समावेश आहे. पुणे विमानतळाचे नाव ३१ पैकी १६ सेवांमध्ये घसरले आहे. ते खालीलप्रमाणे,
१) चेक-इन क्षेत्र सहजपणे न सापडणे, २) चेक-इन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता,
३) सुरक्षा तपासणीचा प्रतीक्षा कालावधी, ४) सुरक्षा कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता,
५) विमानतळावरील दुकाने, ६) सीमाशुल्क कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता,
७) विमानतळातील आसनव्यवस्था, ८) खानपान सेवेतील कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता,
९) वाय-फाय सेवा गुणवत्ता, १०) चार्जिंग केंद्रांची उपलब्धता,
११) मनोरंजन आणि विश्राम सुविधा, १२) स्वच्छतागृहांची उपलब्धता,
१३) स्वच्छ स्वच्छतागृहे, १४) आरोग्य सुरक्षा,
१५) विमानतळावरील स्वच्छता, १६) विविध ठिकाणांना जोडणारी विमाने
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा