Pune Bangalore Highway Accident | पुणे-बंगळरु महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची धडक तर दुसऱ्या कंटेनरने घेतला पेट

Pune Bangalore Highway Accident

पुणे : Pune Bangalore Highway Accident | पुणे बंगलोर हायवेवर रात्रीच्या वेळी दोन वाजण्याच्या सुमरास एका ट्रकने (केए 01 एके 2788) रात्री जांभूळवाडी बोगद्याच्या (Jambhulwadi Tunnel) अलीकडे दोनशे मीटरवर त्यात असणाऱ्या स्टीलच्या घर्षणाने पेट घेतला. या घटनेत ट्रक पूर्णपणे जळला असल्याचे ड्रायव्हर अल्ला बक्ष यांनी सांगितले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान (Pune Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्तीच्या प्रयत्नानंतर आग विझवली.

दुसऱ्या घटनेत पुणे बंगलोर हायवे, दरीपुलावर (Dari Pool) दोन कंटेनरचा अपघात झाला. कंटेनर ने पुढे चाललेल्या ट्रॉलीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. पुणे व PMRDA अग्निशमन दलाकडून तीन वाहने घटनास्थळी दाखल झाले असून जखमी वाहनाचालकास जवानांनी बाहेर काढले आहे.

मोठ्या प्रमाणात केबिनचा चक्काचूर झाल्याने ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
चालकाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे,
अशी माहिती अगिनिशमन अधिकारी प्रकाश गोरे (Prakash Gore) यांनी दिली. (Pune Bangalore Highway Accident)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल