Pune Bangalore Highway Accident | पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमच्या सदस्याचा मृत्यू
सातारा : Pune Bangalore Highway Accident | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळच असलेल्या रायगाव फाटा येथे एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची भीषण धडक होऊन छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष पवार (वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ही घटना रात्री (दि.५) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पवार हे पुणे येथे रुग्ण सोडून साताऱ्याच्या दिशेने येत असताना ही दुर्दैवी घडली. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
संतोष पवार यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते गेली १० वर्ष छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सदस्य होते. रेस्क्यू टीम करीत असताना त्यांनी अनेक जणांचे जीव वाचवले होते. (Pune Bangalore Highway Accident)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी