Pune BJP On Flood | पूरस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पुणे शहर भाजपचे तातडीचे मदत केंद्र आणि हेल्पलाइन ! तीन हजार कार्यकर्ते मदतीसाठी ऑनफिल्ड

शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती
पुणे : Pune BJP On Flood | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत पुणेकरांना मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या कार्यालयासह शहरातील सर्व खासदार आणि आमदारांची कार्यालये पुढील आठ दिवस मदत केंद्र म्हणून 24 तास खुली राहातील अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिली.
शहर कार्यालयाशी नागरिकांना मदतीसाठी 9066515656 किंवा 9928814646 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही घाटे यांनी केले आहे. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने तातडीने ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), सर्व आमदार, माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.
घाटे म्हणाले, आज पहाटेपासून संपूर्ण शहरात भाजपचे तीन हजार कार्यकर्ते ऑनफिल्ड असून पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करत आहेत. पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी हलवणे, आवश्यकतेनुसार प्रथमोपचार, निवास, चहा, न्याहारी, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पूरस्थितीवरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. परंतु ही राजकारण करण्याची वेळ नाही आम्ही सर्व लक्ष नागरिकांना मदत करण्यावर केंद्रीत केले आहे. (Pune Rains)
मुरलीधर मोहोळ म्हणाले, संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत आहे. आज पहाटेपासून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. धरणातून साधारण 40 हजार क्यूसेक्स पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते. परंतु इतके पाणी सकाळी सोडणार याची पूर्वकल्पना प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे होते. नालेसफाईची कामे नीट झालेली नाहीत. आमचे सर्व कार्यकर्ते सकाळपासून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत कार्य करीत आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केले आहे.
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सुचना देत आहेत.
मी स्वतंः सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून, भाजपच्या कार्यकर्त्यांना जे जे मदत कार्य करणे शक्य आहे
ते ते करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सुरक्षित स्थळी नागरिकांना हलविणे, औषधे, धान्य, चहा, नाष्टा, भोजन, पिण्याच्या पाण्याचे टँकर,
कपडे, पत्रे, ताडपत्री, निवास व्यवस्था अशी मदत केली जात आहे.
शासन पातळीवर सर्व निर्णय तातडीने घेतले जातील आणि सर्वोतोपरी मदत केली जाईल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी