Pune Cantonment Assembly | पुणे कॅन्टोन्मेंट मधून काँग्रेसला मिळाला नवीन चेहरा; ठाकरे गटातून केला काँग्रेसमध्ये प्रवेश
पुणे : Pune Cantonment Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. काँग्रेस पुण्यातल्या (Pune Congress) ८ पैकी ३ जागा लढणार असल्याचं निश्चित आहे.
यामध्ये कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), कसबा पेठ (Kasba Peth Assembly) मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांसाठी काँग्रेसने नवीन उमेदवार चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासाठी नवीन चेहरा म्हणून काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील (Shivsena UBT) अविनाश साळवे (Avinash Salve) यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेण्यात आला होता.
आरपीआय गवई गटाकडून दोन वेळा नगरसेवक आणि एकदा काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारीसोबत २०१७ मध्ये शिवसेना पक्षातून उमेदवारी मिळवत ते चार टर्म पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यासोबत आंबेडकरी चळवळीचा दांडगा अनुभव साळवे यांना आहे. आमच्या सोबत कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे सगळेच नगरसेवक संपर्कात असल्याचा दावाही अविनाश साळवे यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना साळवे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असं आश्वासन देऊन पक्षप्रवेश करून घेतला.
मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी मी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटक आहे.
प्रवेश करत असताना मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना या बाबतची माहिती दिली आणि त्यांनीही मला उदार मनाने जाण्याची परवानगी दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे