Pune Cantonment Assembly Election 2024 | रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सुनील कांबळेंच्या प्रचारार्थ भव्य रॅली; पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद
पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) आणि काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री असलेले रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांच्यात लढत होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
दरम्यान आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी (दि.१३) प्रभाग २० येथील भिमशक्ती चौक, ताडीवाला रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीचे स्वागत केले. यावेळी सुनील कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, अडचणी जाणून घेत आगामी काळात ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भाजपाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे प्रभारी सि.टी. रवी, राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवक प्रदीप गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) चे प्रदेशाचे नेते बाळासाहेब जानराव, पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर अध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका हिमाली कांबळे, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष संदीप धांडोरे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संयोजक नगरसेवक उमेश गायकवाड, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सुशांत निगडे, नेते बस्वराज गायकवाड, नेते महेंद्र कांबळे, जयवंत त्रिभुवन, अशोक शिरोळे, विजय बोकेफोडे, संजय बनसोडे, भगवान गायकवाड, लियाकत शेख, राष्ट्रवादी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, किशोर धायरकर, यासंह भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune Cantonment Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’