Pune Cantonment Assembly Election 2024 | सुनील कांबळे यांच्या विजयासाठी लाडक्या बहीणींची भव्य पदयात्रा 

Ladki Bahin Yojana

पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील संघातील भाजप, महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांच्या विजयासाठी मतदारसंघातील लाडक्या बहिणी (Ladki Bahin Yojana) सरसावल्या असून आज या लाडक्या बहिणींनी  भव्य पदयात्रेच्या माध्यमातून लाडका भाऊ, आरोग्यदूत  आमदार सुनील कांबळे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारसंघातील नागरिकांना केले. 

आमदार सुनील कांबळे यांच्या पत्नी प्रीती वाहिनी कांबळे यांच्यासह माजी नगसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांची ही भव्य पदयात्रा काशेवाडी भागात काढण्यात आली होती. या प्रसंगी महिलांनी आमदार कांबळे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची, अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प पूर्ण केल्याची आणि सुनील भाऊंच्या कॅंटॉन्मेंट मतदारसंघाबद्दलच्या व्हिजन ची माहिती सामान्य मतदारांना दिली. विकासाच्या मार्गावर असलेल्या मतदारसंघाचा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी, प्रत्येक अडीअडचणीला धाऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार यावेळी पदयात्रेतील सहभागी महिलांनी केला. 

दरम्यान यावेळी आमदार सुनील कांबळे म्हणाले, मतदारसंघातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो, महिलांचे प्रश्न सोडवण्यासा नेहमीच अग्रक्रम दिला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील 37 हजारांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत, म्हणजे एवढे कुटुंब महायुतीशी जोडले गेल्याचे त्यांनी नमूद केले.  महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मतदारसंघातील कोरेगाव पार्क परिसरातील नदीपात्रात पूरग्रस्त परिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ नये यासाठी येथे सीमा भिंतींची गरज असल्याचे निदर्शनास आले होते.  त्यासाठी मी विधानसभेत राज्यसरकार पाठपुरावा केला आणि अखेर नाल्यांच्या सीमा भिंतींसाठी निधी मंजूर करून घेतला अनेक ठिकाणी सीमा भिंती उभारण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटल्याचे आमदार सुनील कांबळे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed