Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात रमेश बागवे यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद; म्हणाले – “नागरिकांच्या आशा आणि अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध”

पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) विरुद्ध काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री असलेले रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांच्यात सामना रंगणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचाराला आता आठवडाच उरला आहे. दरम्यान उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात रमेश बागवे यांनी (दि.११) पदयात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये सकाळच्या सत्रात संत कबीर चौक, क्वार्टर गेट, घोडमाळा , पेन्शन वाला मज्जित, रास्ता पेठ, पवार हाऊस चौक, समर्थ पोलीस स्टेशन, सोमवार पेठ पोलीस लाईन, ससून क्वाटर्स, माळी महाराज मठ, बरके आळी, बोलाई खाना परिसर, नरपतगिरी चौक अशा मार्गाने पदयात्रा पार पडली.
तर सायंकाळी साचापीर स्ट्रीट, उमरशहा दर्गा, जुना मोदी खाना, सुप्रिया सोसायटी, सागर सोसायटी, बच्चू अड्डा, गवळी वाडा, ताबूत स्ट्रीट, सेंटर स्ट्रीट, ब्लडर रोड , पी ताराचंद, कमरुद्दीन मज्जित मोहल्ला, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, एमजी रोड , शिंपी आळी, राणी लक्ष्मीबाई उद्यान याप्रमाणे पदयात्रा पार पडली. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. महिलांनी औक्षण करत रमेश बागवे यांचे स्वागत केले.
” या परिसरातील नागरिकांच्या आशा आणि अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
मतदारसंघात प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू आणि महाविकास आघाडीचे सरकार याठिकाणी नक्की विजयी होईल”,
असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी व्यक्त केला. (Pune Cantonment Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”,
सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ