Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळेंच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद; म्हणाले,” मी कोरोना काळात कार्यकर्त्यांसह…”

Sunil Kamble

पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीचे सुनील कांबळे (Sunil Kamble) तर महाविकास आघाडीकडून रमेश बागवे (Ramesh Bagwe) निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. दरम्यान सुनील कांबळे यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ (दि.१०) प्रभाग १६ व १७ भागातील निवडुंग विठोबा मंदिर आझाद आळी येथून विठू माऊलीचे आशीर्वाद घेऊन भव्य पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

यावेळी सुनील कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, अडचणी जाणून घेत आगामी काळात ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सुनील कांबळे म्हणाले,” पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी फटाके फोडत माझे स्वागत झाले. मी कोरोना काळात कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून अनेकांचे प्राण वाचवले. अनेकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली. त्यामुळे मतदार मला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत”, असे कांबळे यांनी म्हंटले आहे.

या पदयात्रेसाठी भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे कॅन्टोन्मेंट चे पदाधिकारी कॅन्टोन्मेंट चे भाजपाचे पुणे मनपाचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर, दक्षिण कन्नडाचे भाजपा खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, राष्ट्रवादीचे असंघटित केमिस्ट आघाडीचे अध्यक्ष विनोद काळोखे, नेते सागर पवार, कॅन्टोन्मेंट भाजपाचे दिलीप बहिरट, पुरूषोत्तम पिल्ले आण्णा, मांगीलाल शर्मा, शहर उपाध्यक्ष तुषार पाटील, कॅन्टोन्मेंटचे संपर्क प्रमुख गणेश यादव, कॅन्टोन्मेंटचे सरचिटणीस विशाल कोंडे, सरचिटणीस यश वालिया यांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune Cantonment Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली;
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन

Hadapsar Assembly Election 2024 | महाराष्ट्राची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचेय; जयंत पाटील यांचे प्रतिपादन (Video)

Bibvewadi Pune Crime News | चार महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

You may have missed