Pune Cantonment Assembly Election 2024 | मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक कचेरीचे उदघाटन; सुनील कांबळे म्हणाले – ” यंदा मला ५० हजार मतांचे लीड मिळेल”
पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांच्यासमोर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री असलेले रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांचे आव्हान असणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
दरम्यान महायुती भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील कांबळे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री तथा पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य निवडणूक कचेरीचे उदघाटन (दि.११) पार पडले. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) समवेत सर्व मित्रपक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘विकासाच्या मुद्द्यावर जनते समोर जात आहे आणि याच मुद्द्यावर नागरिक मला पुन्हा संधी देतील.
मागच्या निवडणुकीला मला मताधिक्य कमी होतं. पण यावेळी ५० हजार मतांचे लीड मला मिळेल”,
असा विश्वास आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केला आहे. (Pune Cantonment Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ