Pune Cantonment Assembly Election 2024 | भव्य बाईक रॅलीने आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचाराची सांगता
पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार (BJP Mahayuti Candidate) आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांच्या प्रचाराची सांगता भव्य बाईक रॅलीने करण्यात आली. झुलेलाल मंदिर, आझाद नगर वानवडी येथून निघालेल्या या रॅलीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॅम्प येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या भव्य बाईक रॅली मध्ये माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय (आठवले) चे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महेश पुंडे, बाळासाहेब जानराव — आदींसह यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) समवेत सर्व मित्रपक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील कांबळे म्हणाले, कॅंटॉन्मेंट मतदारसंघात पुणे स्टेशन आणि रुबी हॉल सोबतच इतरही आवश्यक ठिकाणी मेट्रो यावी व नागरिकांच्या प्रवासाच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मेट्रोचा विस्तार करण्याचा तसेच रिक्षा चालक आणि मालक यांच्यासाठी स्थापन झालेल्या महामंडळामार्फत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम देखभालीची सुविधा उपलब्ध करून त्यांची आर्थिक स्थिती सक्षम करण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प आहे. मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. ज्यामुळे लाखो महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल टाकता आले. येणाऱ्या काळात महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोळीबार मैदान येथील पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण करून लहुजी वस्ताद स्मारकाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील असताना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करून घेतला. सुशोभीकरणाची नियोजित कामे आता प्रगतीपथावर असून येणाऱ्या काळात हे काम पूर्णत्वास नेऊन हा परिसर सुशोभित करणे आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी वाटचाल सुरू आहे. मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता मला पुन्हा नक्की संधी देईल असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध