Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नागरिकांसाठी जोमाने आणि ताकतीने काम करणार, पदयात्रेदरम्यान रमेश बागवेंचा निर्धार

Ramesh Bagwe

पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी प्रामुख्याने महत्वाची लढत पाहायला मिळणार आहे. शहरातही सर्वच उमेदवारांकडून प्रचाराचा जोर वाढला आहे.

दरम्यान पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांची (दि.१०) वानवडी, फातिमानगर भागातून पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. महिलांकडून बागवे यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी बागवे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

यावेळी रमेश बागवे म्हणाले, ” लोकांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद व आपुलकी हे खरंच माझी ताकद आहे. यापुढे सुद्धा त्यांच्यासाठी मी अजून जोमाने आणि ताकतीने काम करणार”, असे बागवे यांनी म्हंटले आहे. (Pune Cantonment Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली;
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन

Hadapsar Assembly Election 2024 | महाराष्ट्राची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचेय; जयंत पाटील यांचे प्रतिपादन (Video)

Bibvewadi Pune Crime News | चार महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

You may have missed