Pune Cantonment Assembly | पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात एलईडी व्हॅनद्वारे मतदान जनजागृती

Pune Cantonment Assembly

पुणे : Pune Cantonment Assembly | मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम कक्षामार्फत एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत असून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील कमी मतदान झालेल्या भागात एलईडी द्वारे जनजागृती करण्यात आली.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, एक खिडकी कक्षाच्या समन्वयक कविता कुलकर्णी, दिव्यांग कक्षाचे समन्वयक नवनाथ चिकणे, माध्यम कक्षाच्या समन्वयक प्रज्ञाराणी भालेराव, स्वीप कक्षांचे समन्वयक भगवान कुरळे, निवडणूक कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

या व्हॅनद्वारे नाना पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट गुलटेकडी, वानवडी व ताडीवाला रोड या भागातील राजगोपाल चौक, सेव्हन लव्हज चौक, मार्केट यार्ड, पुणे कॅन्टोन्मेंट रेस कोर्स, चंद्रभागा कचरे चौक, जगताप चौक, दोन्ही वानवडी, फातिमानगर, लिंबानी नगरपत्राचा व ताडीवाला रोड निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्यालय असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अर्सेनल प्लॉट या परिसरातील एस.जी.एस मॉल, काकडे मॉल, जिल्हा परिषद, क्रिम क्रेव्हर, इरानी कॅफ़े हॉटेल्सच्या परिसरात व्हॅन नेऊन तेथील नागरिकांना मतदान करणेसाठी प्रोत्साहित करण्यात आले. या एलईडी व्हॅनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Pune Cantonment Assembly)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed