Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता
पुणे – Pune Court Crime News | पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी.रागीट (Judge D. P. Ragit( यांनी आरोपी अशोकराव शिवाजीराव सावळे (वय.५० रा. जुना जकात नाका, मोशी ता. हवेली जि. पुणे) यांची त्यांचा धाकटा मुलगा युवराज अशोकराव सावळे (२२) याचा रहात्या घरात डोळ्यात मिर्ची पूड टाकून डोक्यात गजाने वार करून मुलगा युवराज वय-२२ याचा खुन केल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली.
खटल्याची हकीकत थोडक्यात…
आरोपी अशोकराव शिवाजीराव सावळे यांना फिर्यादी अभिषेक अशोकराव सावळे वय-२६ हा थोरला मुलगा व मयत युवराज अशोकराव सावळे वय- २२ हा धाकटा मुलगा अशी दोन मुले होती.
वरिल दोन्ही मुले, आरोपी अशोकराव व त्यांची पत्नी सौ. श्र्वेता अशोकराव सावळे असे एकत्रीत मोशी येथे रहात होते. आरोपी अशोकराव सावळे यांचा साईराज ॲटोबाॅडी ॲण्ड फॅब्रीकेशन या नावाने घराजवळच वर्कशॉप व व्यवसाय आहे.
आरोपी अशोकराव सावळेचा मयत धाकटा मुलगा युवराज हा काही कामधंदा करित नव्हता. युवराजला घटनेच्या अगोदर चार वर्षांपासून फिट येण्याचा त्रास होत होता. त्याच्यावर उपचार केले होते व तो त्या आजारातून बरा झाला होता.परंतु त्यामुळे युवराजचा स्वभाव खुप रागीट व चिडचिडा झाला होता. युवराज छोट्या-छोट्या कारणांवरून त्याची आई, वडील, भाऊ व वर्क-शॉपमधील कामगारांना शिवीगाळ करून सतत त्रास देऊन जिवे मारायच्या धमक्या द्यायचा. त्यामुळे युवराजच्या त्रासाला सगळेच कंटाळले होते.
दिनांक २३/०६/२०२२ रोजी घटनेच्या दिवशी युवराजने दुपारी १२ च्या सुमारास पनीरची भाजी चांगली झाली नाही या कारणावरून आईला मारहाण करित होता. आईला सोडविण्यासाठी वडील व भाऊ गेले असता दोघांनाही युवराजने मारहाण केली होती. त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वर्कशॉपमधील कामगारांनाही मारहाण केली होती.
युवराज रात्री घरी आल्यानंतर आई, वडील व भाऊ यांना विनाकारण शिवीगाळ करीत होता. तुम्ही आज जेवायचे नाही व झोपायचेही नाही. तुम्ही झोपला तर तुमच्या डोक्यात दगड घालून ठार करिल अशा धमक्या देऊन आई वडील भाऊ यांना झोपू देत नव्हता व एक दगड बेड वर आणून ठेवला होता.
पहाटे २.३० च्या सुमारास आई, वडील व भाऊ यांना झोप आल्याने आई, वडील, भाऊ हे अंथरुणावर पडले असता युवराजने आईला दगड फेकून मारला. युवराजने त्याची आई व भाऊ यांना घराबाहेर हाकलून लावले. आरोपी अशोकराव सावळे घरातच बसून होते. (Pune Court Crime News)
आरोपी अशोकराव सावळेने घराचे दार आतून बंद केले. त्यांनतर लगेचच आरोपी वडील व मुलगा युवराज यांच्या मध्ये घरात जोरदार झटापट झाली. त्यानंतर काही वेळानंतर आरोपीने घराचे दार उघडले तेव्हा आरोपी अशोकरावचे कपडे रक्ताने माखलेले होते. फिर्यादी मुलगा अभिषेक व पत्नी श्र्वेता यांना आरोपी म्हाणाला “मी युवराजला मारुन टाकले आहे. त्याचा कायमचा त्रास संपवला, त्याच्या त्रासापासून आपण कायमचे मुक्त झालो आहोत. मी युवराजच्या डोळ्यात मिरची पुड टाकून डोक्यात गजाने वार करून त्याला ठार केले आहे व पोलीसांना फोन करून बोलावून घेतले आहे” मुलगा अभिषेक व पत्नी श्र्वेता यांनी घरात जाऊन पाहिले असता युवराज हा मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात गादीवर पडलेला त्यांना दिसला.
काही मिनिटांतच भोसरी पोलीस (Bhosari Police) घटनास्थळी आले. मयत युवराजचा मॄतदेह ताब्यात घेतला.
आरोपीचा थोरला मुलगा अभिषेक सावळेची फिर्याद घेतली.
अशोकराव सावळेच्या विरोधात मुलगा युवराजचा खुन केल्या प्रकरणी खुनाचा (Murder Case) गुन्हा दाखल केला.
त्याचवेळी आरोपीला घटनास्थळी रक्ताने माखलेल्या कपड्यासह व हत्यारासह तात्काळ अटक केली होती.
सरकार पक्षातर्फे न्यायालयात एकूण आठ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. ॲड. मिलिंद द. पवार (Adv Milind Pawar)
यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला. घटनेच्या राञी आरोपीने पोलीसांना फोन केला होता.
त्या फोनच्या काॅलची माहिती पोलिसांनी न्यायालयात हजर केलेली नाही.
त्यामुळे आरोपीनेच खुनाची माहीती पोलीसांना १०० नंबर वर दिली होती हेच सिद्ध होत नाही.
मयत मुलगा युवराज हा रागीट स्वभावाचा होता.अनेक वेळा तो स्वतःच स्वतःला मारुन घ्यायचा.
वर्कशॉपमध्ये देखील युवराजने अनेक कामगारांना मारहाण केल्याने काही कामगार त्याच्यावर चिडून होते.
त्यामुळे त्याला दुसरंच कोणीतरी मारले असावे.
स्वतःच्या पोटच्या मुलाला बाप कसा मारिल. पोलीसांनी फक्त संशयावरून आरोपी अशोकराव सावळेला अटक केली.
बाप असलेला आरोपी अशोकरावनेच त्याच्या पोटच्या मुलाचा खुन केला आहे
हे सरकार पक्ष न्यायालयात सिध्द करू शकलेला नाही. असा युक्तिवाद ॲड. मिलिंद द. पवार यांनी न्यायालयात केला.
वरिल युक्तिवाद न्यायाधीशांनी ग्राह्य धरून आरोपी अशोकराव सावळेची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली.
ॲड.अक्षय शिंदे (Adv. Akshay Shinde) यांनी खटल्यात मदत केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी