Pune Crime Branch | जबरी चोरी, घरफोडीसह 28 गुन्हे करणार्‍या 1175 टोळीप्रमुखासह साथीदार जेरबंद; 4 पिस्टल, 4 काडतुसासह 17 लाखांचा ऐवज जप्त

Pimpri Chinchwad Crime Branch

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch | खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी अशा पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २८ गुन्हे दाखल असलेल्या व चार गुन्ह्यात फरारी असलेल्या ११७५ टोळीचा मोरक्या सुशील ऊर्फ बारक्या भरत गोरे याच्यासह त्याच्या साथीदााराला दरोडा विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ४ पिस्तुले, ४ काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या तसेच १० लाख ७५ हजार रुपयांचे १८ तोळे सोन्या चांदीचे दागिने ८ मोटारसायकल असा एकूण १७ लाख ६२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime Branch)

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटारसायकलवर हवेत पिस्तुल फिरवून इन्स्ट्राग्रामवर रिल तयार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कपड्याचे दुकानात जाऊन पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने कपडे चोरुन नेले होते. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करीत असताना अंमलदार गणेश सावंत, आशिष बनकर व विनोद वीर यांना बातमी मिळाली की, ४ गुन्ह्यात पाहिजे असलेला सुशील ऊर्फ बारक्या गोरे हा कुरुळी गाव परिसरामध्ये एका खोलीमध्ये साथिदारासह पिस्तुल घेऊन रहात आहे. दरोडा विरोधी पथकाने तेथे छापा टाकून गोरे व त्याचा साथीदार अक्षय प्रभाकर कणसेयांना पकडले. त्यांच्या ताब्यातून २ गावठी पिस्टल, २ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

या टोळीने पिंपरी चिंचवड व पुणे शहरात जबरी चोरी, घरफोडी, मारामारी सारखे अनेक गुन्हे केले असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.

खडकवासला, पर्वती, हडपसर, भोसरी, भारती विद्यापीठ, हडपसर, कोंढवा, सिंहगड रोड, विश्रामबाग, चिखली, एमआयडीसी भोसरी, चिखली अशा विविध पोलीस ठाण्यातील १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime Branch)

मध्यप्रदेशातून आणली पिस्तुले

जबरी चोरी, घरफोडी करुन मिळालेल्या पैशांमधून त्यांनी मध्यप्रदेशातून ही पिस्तुले व काडतुसे आणली होती. सुशील ऊर्फ बारक्या गोरे हा सहकारनगर व चिखली येथील प्रत्येकी दोन गुन्ह्यामध्ये फरार होता. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर
यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी,
पोलीस अंमलदार विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, महेश खांडे, गणेश सावंत, आशिष बनकर, विनोद वीर,
उमेश पुलगम, गणेश कोकणे, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, प्रविण माने, अमर कदम,
समीर रासकर, चिंतामण सुपे व औदुंबर रौंगे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील हवालदार माळी व हुले यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद