Pune Crime Branch News | रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 2 पिस्टल, 2 जिवंत काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट 4 ची कामगिरी

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | गुन्हा करण्याच्या तयारीत पिस्टल घेऊन थांबलेल्या दोघा सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने पकडून त्यांच्याकडून २ पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. (Pistol Seized)

https://www.instagram.com/reel/DCgEbzlJozU/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

अनिकेत राजू साठे Aniket Raju Sathe (वय २१, रा. गाडीतळ, येरवडा) आणि आदित्य सतीश घमरे Aditya Satish Ghmre (वय २१, रा. गाडीतळ, येरवडा – Yerawada) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची (Criminals On Police Record) नावे आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, रेकॉर्डवरील वाहनचोर, घरफोडी करणारे, मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे, तडीपार यांना चेक करुन मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS), सह आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma IPS), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle DCP) यांनी दिले होते.

त्या अनुषंगाने युनिट ४ चे पथक येरवडा परिसरात पेट्रोलिंग करत होते. लक्ष्मीनगर भाजी मार्केटजवळ आले असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magdum) यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत राजू साठे व आदित्य घमरे हे गुंजन चौकातील सरगम हॉटेलजवळ पिस्टलसह बसले आहेत. या बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार सरगम हॉटेलजवळ गेले. तेथे सोसायटीच्या भिंतीलगत दोघे जण बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्टल व खिशामध्ये दोन जिवंत काडतुसे असा १ लाख २ हजार रुपयांचा माल मिळून आला. पुढील कारवाईसाठी दोघांना येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerawada Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (Rajendra Mulik ACP),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (PI Ajay Waghmare)यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम,
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), सहायक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत,
पोलीस हवालदार हरीश मोरे, एकनाथ जोशी, प्रवीण भालचिम, विशाल गाडे, विनोद महाजन, विठ्ठल वाव्हळ,
अजय गायकवाड, पोलीस अंमलदार नागेश सिंग कुंवर, विशाल इथापे, देविदास वांढरे, राहुल परदेशी,
भरत गुंडवाड, मनोज सांगळे, पांढरकर, नलावडे यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed