Pune Crime Branch News | शेअर ट्रेडिंगमध्ये 3 कोटींची फसवणूक करुन चोरीची कार घेऊन फिरत होता पुण्यात; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने केले जेरबंद (Video)

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | शेअर ट्रेडिंगमध्ये महिना १० टक्के परतावा मिळवून देतो, असे सांगून लोकांची २ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करुन तो पसार झाला होता. चोरीची गाडी घेऊन पुण्यात फिरत असताना दरोडा वाहनचोरी विरोधी पथकाने त्याला जेरबंद केले.

https://www.instagram.com/reel/C_XTZKnJWGY/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

शंकर रावसाहेब शिंदे (वय ३३, रा. रावताळे, कुरुडगांव, ता. शेवगाव, जि. अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा वाहन चोरी पथकाचे कर्मचारी हडपसर, वानवडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, एक जण नंबर प्लेट नसलेली किया कार घेऊन फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन साडेसतरा नळी येथे शंकर शिंदे याला कारसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ही कार अहमदनगर येथून चोरलेली असून शेवगाव पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल आहे.

शिंदे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शेवगाव तालुक्यामधील लोकांना शेअर ट्रेडिंगमध्ये दरमहा १० टक्के परतावा मिळवून देतो, असे सांगून बर्‍याच लोकांची २ कोटी ८९ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे. त्याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. एकाच चोरट्याकडून दोन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील कारवाईसाठी शिंदे याला शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma IPS), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle DCP), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (Ganesh Ingle ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक पवार, अंमलदार दत्तात्रय खरपुडे, राहुल इंगळे, सुदेश सकपाळ यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद