Pune Crime Branch News | पुण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांकडून 3 पिस्टल, 6 काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाची कामगिरी (Video)

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | सातार्‍याहून पुण्यात विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगाराकडून (Criminal On Police Record) गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ३ पिस्टल आणि ६ काडतुसे असा १ लाख २२ हजार ४१० रुपयांचा माल जप्त केला आहे. अविनाश पोपट मोरे Avinash Popat More (वय ३०, रा. मेन बाजारपेठ, शिवरळ) आणि क्षितिज भाऊसाहेब भोसले Kshitij Bhausaheb Bhosale (वय २०, रा. वॉटर कॉलनी, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

https://www.instagram.com/reel/DCLcyAIpZXi/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी पुणे शहरात सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक गस्त घालत असताना शनिवारी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार यांना गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली की, गंगाधामकडे जाणार्‍या रोडवर गुलटेकडी येथे दोघे जण अग्निशस्त्र घेऊन येणार आहे. या बातमीनुसार, पोलीस पथकाने गंगाधामकडे जाणार्‍या रोडवर लक्ष केंद्रीत केले. मिळालेल्या माहितीनुसार तेथे आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे असा १ लाख २२ हजार ४१० रुपयांचा माल जप्त केला. पुण्यात विक्री करण्याकरीता ते ही पिस्टल घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (Nikhil Pingle DCP), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (Ganesh Ingle ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (PI Pratap Mankar), सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kavthekar),
अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble),
पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार,
हनुंमत कांबळे, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण,
नागनाथ राख यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed