Pune Crime Branch News | अल्पवयीन मुलाकडून वाहनचोरीचे 8 गुन्हे उघडकीस; 5 दुचाकी गाड्या, 3 ऑटो रिक्षा जप्त

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | वारजे माळवाडी (Warje Malwadi) येथील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले़ त्याच्याकडून चोरलेल्या तब्बल ५ दुचाकी आणि ३ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याने वारजे, कोथरुड, सिंहगड रोड, येरवडा, शिक्रापूर पोलीस ठाण्यातील ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. (Vehicle Theft Detection)

शहरात दिवसेंदिवस वाहनचोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा बसावा, याकरीता विशेष मोहिम राबविण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली होती. वाहनचोरीचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एका वाहनचोर चोरीचे वाहन घेऊन वारजे माळवाडी येथे थांबलेली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने घटनास्थळी जाऊन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने ८ वाहने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५ दुचाकी व ३ ऑटो रिक्षा असा अडीच लाखांचा माल जप्त केला आहे. (Minor Arrest In Vehicle Theft Case)

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे,
पोलीस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे,
पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे,
शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या