Pune Crime Branch News | अल्पवयीन असताना खून केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद
पुणे : Pune Crime Branch News | वारजे माळवाडी (Warje Malwadi) येथे एकाला पिस्टलचा धाक दाखवून धमकाविणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने गावठी पिस्टलसह जेरबंद केले.
गणेश उदय जाधव Ganesh Uday Jadhav (वय २१, रा. गणेशनगर सोसायटी, वारजे माळवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. गणेश जाधव हा अल्पवयीन असताना खून व बेकादेशीर जमाव जमवून दुखापत करणे असे कोथरुड व सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हे दाखल होते.
गुन्हे शाखेचे युनिट ३ मधील अधिकारी व कर्मचारी स्वातंत्र्य दिनाच्या अनुशंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग व लॉज चेकिंग व अवैध्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की, मागील दोन दिवसांपासून गणेश जाधव हा एकाला धमकविण्यासाठी पिस्टल दाखवत होता. तो रामनगर, वारजे माळवाडी सार्वजनिक रोडवर थांबला असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार जागेवर जाऊन पोलिसांनी गणेश जाधव याला पकडले. त्याच्या ताब्यातून ४० हजार रुपयांचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त निखिल पिगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे,
पोलीस अंमलदार शरद वाकसे, विनोद भंडलकर, सुजित पवार, केदार आढाव, संजीव कळंबे, इसाक पठाण,
हरिष गायकवाड, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रतिक मोरे, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून
Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”
Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?