Pune Crime Branch News | बी टी कवडे रोडवरील सराफाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणारा चोरटा जेरबंद
पुणे : Pune Crime Branch News | बी टी कवडे रोडवरील (BT Kawade Road Pune) सराफी दुकानात शिरुन दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून दोघा चोरट्यांनी ३५ ग्रॅम वजनाचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेले होते. यापैकी एका चोरट्याला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाला यश आले आहे. (Arrest In Robbery Case)
मनोज ऊर्फ मन्या तुकाराम सूर्यवंशी (वय २३, रा. येप्रे बिल्डिंग, धायरीफाटा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तब्बल १३ दिवसांनी गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंढवा येथील अरिहंत ज्वेलर्स या दुकानात वालचंद आचलदास ओसवाल हे दिवसभराचा हिशोब लिहित असताना दोघे जण दुकानात शिरले. त्यांनी तोंडावर स्प्रे मारुन त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. २ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. या चोरट्यांचे रेखाचित्र पोलिसांनी नुकतेच प्रसिद्धीला दिले होते. गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथकाकडील पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
आरोपींनी ओळख पटु नये किंवा त्यांचा शोध लागू नये, या हेतूने गुन्हा केल्यानंतर त्यांचे अंगावरील जर्कीन बदलले होते. गोपनीय बातमीदाराकडून २१ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार तसेच पडताळणी करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन हा गुन्हा मनोज सूर्यवंशी याने त्याच्या साथीदारांसह मिळून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना तो त्याच्या राहत्या घरी मिळून आला. इतर दोन साथीदारांसह त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याला पुढील कार्यवाहीसाठी मुंढवा पोलिसांच्या (Mundhwa Police) ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक
यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे,
पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, उमाकांत स्वामी,
सैदोबा भोजराव, शुभम देसाई, राजस शेख, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे,
पल्लवी मोरे, स्वाती गावडे, अमित कांबळे, शुभांगी म्हाळसेकर, अमित कांबळे यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत