Pune Crime Branch News | खंडणीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

Pune Crime News | A young man was beaten up and stabbed in the stomach over money for digging a well near his village; Wagholi police arrested three people

पुणे : Pune Crime Branch News | गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून कारचालकाला मारहाण करुन ५० हजारांची खंडणी मागितल्याचा गुन्हा गेल्या वर्षी दाखल होता (Extortion Case). गेले वर्षभर फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa

तेजस मधुकर कांबळे (वय २३, रा. बेनकरी वस्ती, धायरी) असे या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी हे ६ मे २०२३ रोजी आपल्या कारने जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडविली. फिर्यादी यांना गाडीतून खाली उतरवून चाकूचा धाक दाखविला. शिवीगाळ व मारहाण करुन त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) १४ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून तेजस कांबळे हा फरार होता.

https://www.instagram.com/p/DA0ME-2CMFI

गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी धायरी फाटा येथून तेजस कांबळे याला पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

https://www.instagram.com/p/DA0NS3KpNqB

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Ping, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, विनोद जाधव, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

https://www.instagram.com/p/DA0QJTTJNPE

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Dattatray Bharne | ‘इंदापूरातून एका सहकाऱ्याला खूप संधी दिली मात्र….’, शरद पवारांची दत्ता भरणेंवर जहरी टीका; म्हणाले – ‘बारामती अन् इंदापूरात मलिदा गँग…’

Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी सगळंच काढलं; म्हणाले – ‘दिल्लीश्वरांकडून शरद पवारांना ईडीची नोटीस, नमवण्याचे आटोकाट प्रयत्न’

Pimpri Assembly Constituency | पिंपरी विधानसभेत लढण्यास इच्छुक; ‘या’ महिला नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

You may have missed