Pune Crime Branch News | खून करुन 9 महिने फरार असलेला आरोपी जेरबंद; पूर्व वैमनस्यातून गुन्हेगाराचा केला होता खून
पुणे : Pune Crime Branch News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन गुन्हेगाराचा खून (Murder Of Criminal) करुन गेले ९ महिने फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला यश आले आहे.
ओम रामचंद्र गोरे Om Ramchandra Gore (वय २०, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अभिषेक राठोड (वय २२, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) याचा १ नोव्हेबर २०२३ रोजी निर्घुण खून करण्यात आला होता. अभिषेक राठोड याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. दादया पाटोळे व इतरांबरोबर अभिषेक याची भांडणे झाली होती. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी अभिषेकवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला होता. यामध्ये पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. तेव्हापासून ओम गोरे हा फरार होता. (Arrest In Murder Case)
येरवड्यात (Yerawada Police Station) झालेल्या एका गुुन्ह्याचा युनिट ४ चे पथक समांतर तपास करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल परदेशी यांना त्यांच्या बातमीदाराकडून ओम गोरे हा वाडिया बंगल्याजवळील फुटपाथवर थांबला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन ओम गोरे याला ताब्यात घेतले. त्याने खूनामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. (Pune Crime Branch News)
पोलिस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (PI Ajay Waghmare),
पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaydeep Patil), वैभव मगदुम (PSI Vaibhav Magadum),
पोलीस अंमलदार हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, विशाल गाडे, एकनाथ जोशी, नागेसिंग कुंवर,
विनोद महाजन, जहांगीर पठाण, वैभव रणपिसे, राहुल परदेशी, विशाल इथापे, देविदास वांढरे, शितल शिंदे यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये