Pune Crime Branch News | पेरणे येथील हातभट्टीवर कारवाई ! साडेआठ लाखांची तयार दारु व रसायन केले जप्त
पुणे : Pune Crime Branch News | पेरणे (Perne Phata) येथे लावण्यात आलेल्या हातभट्टीवर (Hat Bhatti Chi Daru) गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने कारवाई केली. त्यात ८ लाख ४४ हजार रुपयांची ३५ लिटर तयार दारु आणि तब्बल १६ हजार ५०० लिटर दारु तयार करण्याचे रसायन व इतर साहित्य असा माल जप्त करण्यात आला आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे लोणीकंद (Lonikand) परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व विनायक येवले यांना माहिती मिळाली की पेरणे येथील वाळके वस्तीतील माऊलाई चौक येथे भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात आहे. या माहितीवरुन पोलिसांनी तेथे छापा घातला. त्यात तेथे ३५ लिटर तयार दारु व १६ हजार ५०० लिटर दारु तयार करण्याचे रसायन व इतर साहित्य मिळाले. याबाबत दोघांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (Nikhil Pingle DCP), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (Rajendra Mulik ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार (Sandipan Pawar), सहायक पोलीस निरीक्षक छबु बेरड (API Chabu Berad), पोलीस अंमलदार राजेश अंभगे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’