Pune Crime Branch News | अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्यास अटक; अडीच लाखांचे एलएसडी, एमडी, एमए जप्त

पुणे : Pune Crime Branch News | विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगणार्या एक तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Norcotics Cell Pune) पकडून त्याच्याकडून अडीच लाखांचे एल एस डी व एम डी एम ए जप्त केले आहेत. (Pune Crime Branch News)
https://www.instagram.com/p/DBLGPPCCCIP
तेजस सुरेश गोपाल (वय २२, रा. डहाणुकर कॉलनी, कोथरुड मुळ रा. कोकोडी मकरा, जि़ कालीकत, केरळ) असे या तस्कराचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक कोथरुडमध्ये १४ ऑक्टोबर रोजी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वनाज मेट्रो स्टेशनजवळ लक्ष केंद्रीत केले. मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ संशयित दिसल्याने त्याला पकडले. त्यांची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे ४८ हजार रुपयांचे एल एस डी व एम डी एम ए हा अंमली पदार्थ तसेच २ लाख रुपयांच्या एम डी एम ए ५० पिल्स गोळ्या आढळून आल्या. पोलिसांनी त्याचबरोबर २० हजाराचा मोबाईल व दीड लाख रुपयांची मोटारसायकल असा ४ लाख १८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DBJlNLYCZwm
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे,
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड,
सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण,
पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी,
संदिप जाधव रवींद्र रोकडे, मयुर सूर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, नितीन जगदाळे,
,निलम पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DBJf47OJhAk
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा